पतसंस्था वृत्त

गंगापूर तालुका शिक्षक पतसंस्थेला 29 लाख नफा

2009-10 या आर्थिक वर्षामध्ये गंगापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेला 29 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन तथा शिक्षक संघटनेचे राजाध्यक्ष मधुकर वालतुरे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली.
संस्थेने 10 कोटींचे कर्जवाटप केले असून संस्थेकडे सभासद शेअर्स व ठेव रूपाने 5 कोटी 50 लाख रुपयांचे भागभांडवल असून 100 टक्के वसुलीवर भर देऊन सचोटीने व्यवहार केल्यामुळे सहकारी बॅंकेकडून 12 टक्के दराने कॅश क्रेडिट घेऊन सभासद कर्जावर 10 टक्के व्याज आकारणी करून 2।। टक्के व्याज सभासदाच्या कर्जावर कमी घेऊनही संस्थेला 29 लाख रुपये नफा झाला असल्याचे संस्थेचे चेअरमन मधुकर वालतुरे यांनी सांगीतले.
फैज नागरी पतसंस्थेच्या कर्ज वितरणास सुरुवात

फैज अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून पुन्हा एकदा कर्ज वितरणास सुरुवात झाली आहे. नुकत्याच सोसायटीच्या दोन शाखादेखील सुरू करण्यात आल्या आहेत.
अशोक नागरी सहकारी पतसंस्थेस 25 लाखांचा नफा

नाशिक येथील श्री अशोक नागरी सहकारी पतसंस्थेस सन 2009-10 अखेर 25 लाख 84 हजार 832 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे यांनी दिली.
संस्थेचे भागभांडवळ 50 लाख 14 हजार 330 रुपये असून स्वनिधी 1,05,74,845 रुपये इतका आहे. ठेवी 6 कोटी 92 लाख 90 हजार 814 रुपयांच्या आहेत.
सुवर्णा नागरी पतसंस्थेस 40 लाखांचा नफा
नाशिक येथील सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेला चालू वर्षी ढोबळ नफा रु. 64 लाख इतका झाला असून, सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रु. 40 लाख झाल्याची माहिती चेअरमन भास्करराव कोठावदे यांनी दिली.
सन 1994 मध्ये स्थापन झालेल्या संस्थेची आज रोजी 1,419 सभासद संख्या असून खेळते भांडवल 19 कोटी आहे व वसूल भागभांडवल रु. 69 लाख इतके आहे. त्याचप्रमाणे एकत्रित ठेवी 14 कोटी 35 लाख इतक्या जमा असून, सभासदांना कर्जवाटप रु. 10 कोटी 34 लाखांचे करण्यात आले आहे. संस्थेची एकूण गुंतवणूक रु. 7 कोटी 64 लाख इतकी आहे.
सिद्धिविनायक पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

नाशिक येथील रविवार कारंजा सिद्धिविनायक पतसंस्थेच्या विद्यमाने गोरगरिबांना कर्ज, विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप, मनपा शाळा दत्तक घेणे, सभासदांसाठी व  सर्वसामान्य नागरिकांसाठी  धर्मार्थ दवाखाना चालविणे असे अनेक विधायक उपक्रम राबविले असून सभासदांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नरेंद्र नाना पवार यांनी केले.
संस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेत सर्वच विषय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. यावेळी संचालकाच्या हस्ते सभासदांच्या पाल्यांना मोफत वह्या, भेटवस्तू देण्यात आल्या.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.